DSRR NEWS ABOUT
थेट अचुक,महत्वाचं आणि नेमकं म्हणजे डीएसआरआर आधुनिक जगाची एकविसाव्या शतकात पाऊले टाकुन दोन दशकवर्षे उलटून चाललीयेत.माहिती तंत्रज्ञान व संदेशवहनात अवघं जग आज अद्ययावत प्रगती करत आहे.ज्याचं संदेहशहन जितकं अचुक,दक्ष व लक्ष्यभेद साधणारं असेल,अशांचं महत्व वास्तवात निर्विवाद आहेच.उद्योगविस्तार,व्यापारवाढ,संरक्षणक्षेत्र,जनसंपर्क,समाजप्रबोधन ह्यात महत्वाचं योगदान देण्यात तसेच समाजात योग्य तो बदल घडवुन आणण्यात आजची संदेशवहने महत्वाची भुमिका बजावित आहेत.वाढत्या तंत्रज्ञानाच्या जोरावर सोशल मिडिया,वेब पोर्टल्स या सगळ्यांचं डिजिटलायजेशन मोबाईल क्रांतीमुळे अगदी हातोहात वाचकांच्या हाती पोहचत आहे.त्यामुळे प्रस्थापित संदेशवहनांना यामुळे आव्हान पोहोचत आहे,म्हणुनच बदलत्या माध्यमांची ही व्यापक गरज व त्याची शक्ती ओळखुनच जी संदेशवहने पुर्वी फक्त छापिल स्वरुपात असायची,आज त्यांची सुद्धा भाऊगर्दी ह्या डिजीटलायझेशन मध्ये होऊ पाहत आहे;होत आहे.दररोजच्या बातम्या,माहिती,संदेश,ह्यांचा होणारा भडिमार आपल्याला सहन करावा लागतोच.आपलं म्हणणं समोरच्याला पटवून देण्यासाठी केलेला भाषेचा प्रभावी वापर,आक्रमक वा वैचारीक देहबोली यांचं संदेशवहन संवादाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत प्रभावीपणे पोहचत आहे.येथे संदेशकर्त्याचा सुप्त असा काहीएक हेतु असतो,जो त्याला पोहोचवायचा असतो.हेतुशिवाय कृती आजच्या जगात मुर्खतेचं लक्षण समजलं जातं.संदेशकर्त्याला अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचुन एक प्रकारची जाण त्याला समाजात उभी करुन काही एक हेतु साध्य करायचा असतो.त्यासाठी सुयोग्य हेतु असणं फार गरजेचं आहे. जर योग्य हेतु नसेल तर आपल्या करण्याला काहीच महत्व उरत नाही. कैकजण त्या हेतुशिवायच्या प्रवाहात वाहत जात असतात. संदेशवहन म्हणजे फक्त लिहिणं,बोलणं,सांगणे,ऐकणे,वाचणे इतकंच न राहता त्या संदेशवहनातला वर्तनहेतु जर का समोरच्याला नीट समजला तर योग्य त्या परिणामांपर्यंत आपण नक्कीच पोहचू शकतो.निवडणुकांच्या काळात विविध राजकीय पक्षांमध्ये असणारे प्रवक्तेसुद्धा चर्चेद्वारे समाजात संवाद-विसंवाद करत असतात.आपल्या उत्कृष्ट संवादकौशल्याद्वारे संवाद साधून पक्षकार्य व पक्षहीत(?) साधत असतात.पण ह्या सगळ्या संदेशशहनामागील संदेशकर्त्याचा हेतु जर आपल्या मनाला ओळखता येत नसेल वा आपण दुर्लक्षित असु तर आपणही त्या प्रवाहातीलच दगड आहोत,असेच म्हणावे लागेल.मानवी जीवन आज नको तितके अस्तित्वसंघर्षात्मक झाले आहे.जीवनाच्या स्पर्धात्मक परिक्षेतुन आज प्रत्येकाला जावे लागत आहे.अशा वेळी चांगले विचार,माहिती,भावना कल्पना,जाणिवा,आत्मभान ठेवत समाजात त्या घेऊन जाणे,अगत्याचे झाले आहे.योग्य,थेट व अचुक बातमी,वा माहिती आजच्या युगात शोधणे, म्हणजे वाळवंटात पडलेली एखादी सुई शोधण्यासारखे आहे.नेमक्या ह्याचं जाणिवेतून आमच्या पोर्टलचा श्रीगणेशा झाला.सृजन,आत्मभान,जिद्द ,ह्यांच्या जोरावर कैक जणांनी यशोशिखरे गाठली,त्यांचा अनुभव नवयुवकांसमोर पोर्टलमधुन मांडण्याचा आमचा एक प्रयत्न असेल,वाढत्या धकाधकीच्या जीवनात देशप्रेम,नोकरी,आरोग्य,कुटुंबभावना जपण्याबरोबर संवादाद्वारे समाजमित्रांबरोबर देखील आपल्याला जोडून घेण्याचा आमचा छोटासा प्रयत्न असेल.जेणेकरुन समाजप्रेरणा जिंवत रहावी.मनोरंजन त्यांच्या बातम्या तर असतीलच पण त्यामागचे हसवणा-या विदुषकाचेही अश्रु टिपण्याचा आमचा एक प्रयत्न राहील,आंदोलने ,राजकीय पक्षाभिनिवेश समाजात असतातच,आणि ते यापूर्वीही होते व नंतरही राहतील म्हणुन तेच काय ते महत्वाचे व बाकी सर्व शुन्य!असं नाही तर राजकारणाबरोबर समाजकारणाचही महत्व अधोरेखित करण्याचा आमचा अट्टाहास असेल.हे सर्व आम्ही आपणापर्यंत घेऊन येत आहोत एका डिजीटल पोर्टलच्या माध्यमातुन...
डी एस आर आर न्युज म्हणजे काय?...
डी एस आर आर न्यूज म्हणजे काय?तर बातमी मागील एक बातमी.डी एस आर आर न्युज एका अनोख्या स्वरूपात आपल्या समोर येत आहे. इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाच्या स्पर्धेत आता डिजिटल मीडियाने आपले महत्व अधोरेखित केले आहे,हे आपण जाणताच. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन खेळु लागलेत.'चटकन क्लिक पटकन बातमी' अशा युगात आज आपण वावरत आहोत.वाढत्या स्पर्धेत प्रत्येकाला नेमक्या व अचुक चालू घडामोडींची माहिती हवी असते. प्रत्येक घडामोडीचा उलगडा आपल्यासमोर करण्याचा आमचा मानस आहे.आमच्या या प्रयत्नांना आपल्या आशीर्वादाची,प्रेमाची व एका आपल्या क्लिकची गरज आहे. ज्यात आम्ही ग्वाही देतो,अगदी थोडक्यात पण राजकीय घडामोडी, राजकीय विश्लेषण,तसेच दररोज सतावणाऱ्या समस्या,मनोरंजन तसेच राजकीय लेख असा मेवा आपल्याला दररोज देण्याचा आमचा प्रयत्न असेल.
आपला दररोज चा सोबती
डी एस आर आर न्यूज टिम